Tuesday, May 26, 2009

टिपिकल मराठी लुक

टिपिकल मराठी लुक म्हणजे काय हे मला नक्की समजत नाही.. अनेक लोकांनी मला सांगितले आहे की मी टिपिकल मराठी दिसत नाही..आता हे मला सांगायचा त्यांचा काय हेतू होता हे देवालाच माहिती..टिपिकल कोकणस्थ लुक सर्व मराठी लोकांना परिचित आहेच! गोरे घारे त्यात थोडेसे चवीपुरते खडूस पण आणि विनाकारण शिष्ठ आविर्भाव...हा झाला कोकणस्थ लुक ..पुणेकर कोकणस्थ व्यक्तिचित्र हा अगदीच विस्तृत विषय आहे..एकदम पीएचडी टॉपिक..या ब्लॉग मधे नाइलाजाने जागेची कमतरता असल्याने जास्त काही लिहिता येणार नाही...असो., पण बाकी मराठी लोकांचा आणि टिपिकल मराठी लुकचा संबंध काय? त्याला काही विशेष संदर्भ नाहीत..आता सोलापूर महाराष्ट्रातील नॉन-मेट्रो शहर असल्याने ९०% लोक मराठी असतील...किंवा मी फक्त तेवढ्याच मराठी लोकांबरोबर संपर्कात आले असेन..म्हणुन तो खूप मनोवेधक विषय नाही...त्यातही टिपिकल व्यक्तिमत्वे आहेत..नाही असे नाही.... पण एक मात्र नक्की..मध्यमवयीन मुम्बईकर मराठी लोकांचा एक टिपिकल लुक असतोच..बोलण्याची पद्धतही असते..पण ती शब्दात साठवता येणार नाही..त्यासाठी दादर व्हीटी मौर्निंग लोकल मधे दोन चारदा प्रवास करावा लागेल..गप्पांचे विषयही टिपिकल असतात..क्रिकेट, इलेक्शन, शिवसेना, महागाई हे झाले पुरुषांचे विषय आणि सारेगामा, मराठी सिरिअल्स, दीनानाथ मधील नविन नाटके, रात्रीच्या जेवणाचा बेत हे स्त्रियांचे विषय.. या व्यतिरिक्त काही उदाहर तुम्हाला माहिती असेल तर मलाही सांगा..माझे संशोधन चालूच आहे...नविन माहिती मिळालीकी ताबडतोब पोस्ट करेन :)

No comments: